Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची पोलिसांनी केला उलगडा, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील

team by team
October 27, 2021
in क्राईम
0
सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची पोलिसांनी केला उलगडा, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील
नंदुरबार l प्रतिनिधी

सामाजिक तेढ निर्माण होईल यासाठी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून पडताळणी ईदए मिलादचे दिवशी चित्रीत झाला असल्याचे निष्पन्न नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर असलेल्या लव नंदुरबार या नावाचे फलकासमोर एक युवक हिरव्या रंगाचा झेंडा फिरवित असल्याची व्हिडीओ क्लिप ही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचचे दिवशी चित्रीत झाली असल्याच्या अफवेसह मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर प्रसारीत झाली होती .

नंदुरबार शहर हे संवेदनशिल शहर असून सदर व्हिडीओमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी सदरचा व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले . पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकामार्फत सदर इसमाचा शोध घेतला . त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव तेली अमन आशिक हसेन रा . गाझी नगर , नंदुरबार असे असून त्यास स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्याचे मोबाईलची तांत्रीक तपासणी केली . त्यात सदर तरुणाने ईद ए मिलादचे दिवशी दि. १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी रात्री ११.०८ वाजता हिरव्या रंगाचा इस्लाम धर्माचा झेंडा फिरवितांना सदर व्हिडोओ चित्रीत केला असल्याचे निष्पन्न झाले . सदर व्हिडीओ चित्रीत करण्यामागे त्याचा कोणताही गैरहेतु नसल्याचे समोर आले आहे . सदर व्हिडोओचा भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे समाज माध्यमांवर सदर व्हिडिओ भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी संबंधीत असल्याची अफवा असामाजिक तत्वांकडून सामाजिक तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने प्रसारीत करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे . नंदुरबार पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . सामाजिक सलोखा न बिघडविता शांतता ठेवावी तसेच कोणी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करीत असेल तर त्याचेवर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे रहदारीस होतोय अडथळा, अपघाताला मिळतेय निमंत्रण, तक्रार करायची तरी कुणाकडे ?

Next Post

चिनी फटाके तसेच देवी-देवता आणि राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add