Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे रहदारीस होतोय अडथळा, अपघाताला मिळतेय निमंत्रण, तक्रार करायची तरी कुणाकडे ?

team by team
October 27, 2021
in क्राईम
0
पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे रहदारीस होतोय अडथळा, अपघाताला मिळतेय निमंत्रण, तक्रार करायची तरी कुणाकडे ?

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलाचे सुत्रे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी स्विकारल्यानंतर विविध कारवाया करण्यात येत आहे. यात रहदारीस अडथळा ठरणार्‍यांविरूध्दही कडक पाऊले उचलत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. असे असतांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासमोर पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा आहे. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सामान्य नागरीकांवर कारवाई करणारे पोलीस दलामुळेच अनेक दिवसांपासून गैरसोय होत असल्याने नागरीकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर विविध गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर कोंबीग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. मागील वर्षाच्या तुलनेत नुकतेच पोलीस अधिक्षकांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत यावर्षी रस्त्या अपघातामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये वाढ झालेली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विशेष मोहिम आखून जिल्हाभरात दारू पिवून वाहन चालविणार्‍या ४२ मद्यपी वाहन चालकांविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यासोबत नागरीकांच्या सुरक्षितेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे त्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या विरूध्दही पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे सखारात्मक चित्र दिसत असतांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या बाबतीत विरोधाभास दिसून येत आहे. नंदुरबार शहरापासून दिड कि.मी. अंतरावर नंदुरबार-भालेर रस्त्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे स्थलांतर झाले आहे. त्याठिकाणी तालुका पोलीसांनी एका ट्रकवर कारवाई ती पकडली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरून जाणार्‍या नंदुरबार भालेर रस्त्यावर ही ट्रक उभी आहे. नंदुरबार ते भालेर रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे मोठया प्रमाणावर नागरीकांची या वाहनामुळे गैरसोय होतांना दिसत आहे. या उभ्या असलेल्या ट्रकमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस दल रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी लॉरीधारक, रिक्षाधारक यासह सामान्य नागरीकांवर कडक कारवाई करते. तर एकीकडे पोलीसांमुळेच नागरीकांना रहदारीस अडथळा होत आहे. हे विरोधाभासाचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून शेकडो नागरीक अनुभवत आहे. पोलीस दलाच्या या कारणाम्याविरूध्द नागरीकांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी पसरली आहे. पोलीस दलाच्या विरोधात नागरीक कोणाकडे तक्रार करावी. असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. याबाबतीत या घटनेची माहिती मिळाल्यास पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील निश्‍चितच या रहदारीच्या अडथळयापासून सामान्य नागरीकांची सुटका करतील. असा विश्‍वास दबक्या आवाजात नागरीक व्यक्त करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष करण्याच्या तो व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, नंदुरबार शहर पोलिसांचे आवाहन

Next Post

सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची पोलिसांनी केला उलगडा, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add