नवापूर l प्रतिनिधी-
नवापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी उज्वला योजने अंतर्गत लाभार्थीना मोफत गॅस सिलेंडर-शेगडी शांतीनगर येथे खा. डॉ. हिना गावित,आ. विजयकुमार गावीत,जि.प सदस्य डॉ. सुप्रिया गावीत,धनंजय गावीत यांचा हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी ६४३ लाभार्थीना गँस शेगडी वाटप करण्यात आले.

यावेळी मंचावर जि.प सदस्य पार्वती पाडवी,सविता जयस्वाल,प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे एजाज शेख,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,नगरसेवक महेंद्र दुसाने,माजी नगरसेविका सुनिता वसावे,जैन्या गावीत,वडकळबी सरपंच जितु गावीत,चौकी चे रवि गावीत,अजय गावीत,प्रदिप वळवी,भिमसिंग पाडवी,मोरकरंजा सरपंच सुनिल गावीत,आयुब गावीत,माजी सरपंच विरसिंग कोकणी,अतुल ठिंगळे,धुळीपाडा सरपंच आमेश गावीत,दिनकर गावीत,दिलीप गावीत,माजी सभापती विनायक गावीत,हरीष पाडवी,आदी उपस्थित होते.
यावेळी खा. डॉ हिना गावीत म्हणाल्या की ही योजना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सुचवली होती त्यानंतर मी खासदार निवडणुन आल्या नंतर मी वेळोवेळी लोकसभेमध्ये चर्चा करुन ही योजना पास करुन घेतली.त्यानंतर या उज्वला योजनेची सुरुवात नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हामधुन सुरुवात केली.तेव्हा पासुन सदरची योजना सुरु आहे.खासदार डॉ. हिना गावीत पुढे म्हणाल्या की महिला सक्षमीकरण योजनेची मी देशाची अध्यक्ष आहे या नात्याने आदिवासी महिलांचा अडीअडचणी समस्याच्या अभ्यास करुन ते सोडविण्याची माझी जवाबदारी आहे.त्यासाठी देशभरात दौरे करुन विविध राज्यातील महिल्यांचा योजनेचा मी अभ्यास करीत आहे.यापुढे ग्रामिण भागातील महिलांचा पिण्याचा पाण्याची समस्या घर घर जलयोजना अंतर्गत प्रत्येक घराचा समोर शुध्द पिण्याचा पाण्याची सोय केली जाणार आहे.महिलासाठीचा असंख्य योजण्याची या प्रसंगी त्यांनी माहिती करुन दिली व महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आहवान ही केले.यानंतर आ.डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले की, मी मंत्री असतांना आदिवासी बांधवानसाठी असंख्य योजना आणल्या.खासदार डॉ हिना गावीत यांनी धडगाव अक्कलकुंवा भागात विज कनेकशन , सौरउर्जा आणुन सुजलाम सुफलाम केले.तुमचा गावातील बंधारे फुटले असतील त्यांची माहीती दया. आम्ही हे काम पुर्ण करु.नंदुरबार जिल्हात नविन मेडिकल कॉलेज सुरु केले आहे.या ठिकाणी १५० ते २०० डॉक्टर उपब्लध होणार आहे.नंदुरबार जिल्हात आदिवासी बांधवासाठी असंख्य योजना खा. डॉ हिना गावीत व स्वता मी आणार आहे.ज्याचे शौचालयाचे काम बाकी असतील त्यांनी पुर्ण करुन घ्यावे.
यावेळी देवमोगरा गॅस एजन्सी नवापूर तर्फे १६८ लाभार्थीना गॅस वाटप करण्यात आले तर अवधुत गॅस एजन्सी तर्फे ४७५ लाभार्थी असे एकुन ६४३ लाभार्थीना गँस शेगडी वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार धंनजय गावीत यांनी केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एजाज शेख यांनी तर आभार धनंजय गावीत यांनी मानले.








