नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी ॲड. राम रघुवंशी व सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड झाली असून.याची घोषणा पिठासिन अधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी केली.

नंदुरबार जि.प.तील ११ सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे या गटातील सदस्यत्वासाठी नव्याने पोटनिवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे सदरची निवडणूक लांबणीवर पडली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल देखील बदलले आहे. सन २०१९ मध्ये जि.प. निवडणूक झाल्यानंतर त्यात भाजपा व कॉँग्रेसच्या प्रत्येकी २३ तर शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादीचे ३ सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या ७, कॉँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी २ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणूकीनंतर भाजपाचे ४, कॉँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य विजयी झाला आहे. यामुळे आता नंदुरबार जि.प.मध्ये सद्यस्थितीत कॉँग्रेस सर्वाधिक २४, भाजपा २०, शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ३ असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, आज जि.प.उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी ॲड. राम रघुवंशी व सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड झाली असून.याबाबत ची घोषणा पिठासिन अधिकारी चेतनसिंग गिरासे यांनी केली.








