नंदुरबार l प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रकाशा येथे माजी. खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दिनांक 28 रोजी ऊस परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न प्रलंबित असून ते आहे आद्यपपपर्यंत सुटलेले नाहीत.त्याचप्रमाणे पपई व केळी उत्पादकांचे देखील प्रलंबित आहेत. ऊस,केळी व पपई उत्पादकांचे प्रश्न सुटावेत यासाठी यासाठी गेल्या काही वर्षांपासून संघटना लढा देत आहे.त्यानुसार समाधानकारक भाव मिळत होता.मात्र सध्या गेल्या दोन वर्षांपासून पपई उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे.समाधानकारक भाव मिळत नाही. महावितरणणकडून देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.यामुळे विविध प्रश्न सोडविण्यासाठी दि.28 रोजी माजी खा.राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती घनश्याम चौधरी यांनी पत्र परिषदेत दिली.
बांधवरच मिळणार रक्कम:शेतकऱ्यांकडून ठराव
बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती.यामुळे आता शेतकऱ्यांकडून मालाची विक्री केल्यावर मोजणी झाल्यावर तात्काळ शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचा ठराव करण्यात आल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले.








