नंदुरबार | प्रतिनिधी
पंचायत समितीत परिवर्तनाची नांदी सुरू झालेली आहे. नंदुरबार तालुक्यात कॉंग्रेस व शिवसेना एकत्र काम करीत आहे. पुढील कालावधीत सभापती देखील कॉंग्रेस,शिवसेना युतीच्या राहणार आहे.असे प्रतिपादन शिवसेना नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार येथे पंचायत समितीच्या उपसभापती महाविकास आघाडीचे कॉग्रेसचे कमलेश दिलीप महाले यांना ११ मते मिळाली तर भाजपाच्या छाया जितेंद्र पवार यांना ९ मते मिळाल्याने कॉग्रेसचे कमलेश महाले २ मतांनी विजयी झाले.कमलेश महाले यांना शिवसेनेच्या ८ सदस्यांनी मतदान केले.त्यामुळे कॉंग्रेसचे कमलेश महाले विजयी झाले.या निवडीनंतर बोलतांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की,पंचायत समितीत परिवर्तनाची नांदी सुरू झालेली आहे. नंदुरबार तालुक्यात कॉंग्रेस व शिवसेना एकत्र काम करीत आहे. पुढील कालावधीत सभापती देखील कॉंग्रेस,शिवसेना युतीच्या राहणार आहे.पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्यामुळेच मतदारांनी मोठा विश्वास दर्शवला. विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या विकासासाठी सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगीतले.