Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

team by team
August 25, 2026
in राजकीय
0
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

नंदुरबार l प्रतिनिधी-

माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने सलग आठ महिने गंभीर आजारपणाशी झुंज दिल्यानंतर त्यांचे नंदुरबार येथे आपल्या जन्मभूमीत आगमन झाले. दीर्घ प्रतिक्षेनंतर ते नंदुरबार येथे सुखरूप परतलेले पाहून त्यांच्या निवासस्थानी भेट देणाऱ्या चाहत्यांमध्ये त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण पहायला मिळाले.

जानेवारी 2026 अखेर हृदयविकारामुळे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना नासिक येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले होते. बायपास सर्जरी नंतर प्रकृती सुधारली होती. परंतु पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबई येथील रिलायन्स समुहाच्या रुग्णालयात हलवणे भाग पडले होते. या सर्व काळात डॉक्टर सौ. कुमुदिनी गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. सुप्रियाताई गावित यांनी त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी पाठ पुजा आणि नवस ठेवणे चालवले होते. अनेक गावातील कार्यकर्त्यांनी चाहत्यांनी प्रार्थना करणे सुरू ठेवले होते.

त्या दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचप्रमाणे पक्षातील अनेक वरिष्ठ मान्यवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि शुभकामना व्यक्त करण्यासाठी नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा भेट देत होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः मुंबईतून प्रवास करून नंदुरबार येथे उपस्थित झालेले पाहून कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांचे निवासस्थानी आगमन झाले त्याप्रसंगी फुलांचा वर्षाव करून आणि पंचारती ओवाळून गावित परिवारातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. त्यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर शहरातील नगरसेवक, मान्यवर पदाधिकारी, शैक्षणिक सांस्कृतिक व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची रांग लागली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

Next Post

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

Next Post
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add