- नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भाजीमार्केट कमिटीसमोरून ७ लाखाची ट्रक लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे लालसदारनगर येथील राहणारे इम्रानखान युनूसखान पठाण यांची ट्रक (क्र.एम.एच.०४-ई.बी.०३८७) नंदुरबार शहरातील भाजीमार्केटचा बाहेर उभा केला होता. या ट्रकमध्ये कांदा भरून मिळाला नाही. म्हणून त्यांनी ट्रक भाजीमार्केट समोर लावून नंदुरबार येथील मित्राकडे मुक्कामी गेले असता त्यानंतर त्यांना दोन दिवसानंतर कांदे भरण्याची पावती मिळाली. याबाबत त्यांचे ट्रान्सपोर्टवाल्याशी बोलणे झाले. त्यानंतर ते कांदे भरण्यासाठी ट्रक घ्यायला गेले असता त्यांना तेथे ट्रक आढळून आला नाही. म्हणून ईम्रानखान युनूसखान पठाण यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि मोहिते करीत आहेत.








