Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेती मोजण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी, पांच जण जखमी, १६ जणांविरुद्ध गुन्हा

team by team
October 23, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा ते गुजरजांबोली रस्त्यावर शेत मोजणीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला . या वादात तलवार व लोखंडी रॉडने वार केल्याने दोन्ही गटातील पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील १६ जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , किस्मत कमरोद्दीन शेख ( रा . बालाजीवाडा , नंदुरबार ) व मनिष हितांशू पटेल यांच्यात शेत मालकीच्या हक्कावरुन कोर्टात दावे दाखल आहेत . किस्मत शेख व साक्षीदार वसंत शंकर चौधरी हे शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे करणखेडा ते गुजरजांबोली रस्त्यावर गेले होते . वसंत चौधरी हे वाहनाने किस्मत शेख यांना सोडून वाहनात बसले होते . यावेळी मनिष हितांशू पटेल , शितल हितांशू पटेल , लाला एकनाथ पटेल , पप्पू जगन्नाथ पटेल व त्यांच्यासोबत असलेले पाच ते सहा जणांनी वसंत चौधरी यांना हाताबुक्यांनी मारहाण केली . तसेच मनिष पटेल याने तलवारीने वार केला असता तो वसंत चौधरी याने चुकविला . शितल पटेल याने लोखंडी रॉडने वसंत चौधरी यांच्या मानेवर मारुन दुखापत केली . तसेच मोबाईल व वाहनाचे नुकसान केले . याबाबत किस्मत शेख यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सुमारे १० संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत . तसेच मनिष हितांशू पटेल यांनी परस्पर फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की , शेत मोजणीच्या कारणावरुन शेख किस्मत कमरोद्दीन शेख याने तलवारीने मनिष पटेल यांच्यावर वार केला असता तो चुकविला . वसंत चौधरी याने साक्षीदार संदिप पाटील यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली . दिनेश प्रकाश पटेल व इतर तिघा इसमांनी मनिष पटेल व संदिप पाटील यांना हाताबुक्यांनी मारहाण केली . याबाबत मनिष पटेल यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची तत्परता

Next Post

आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

Next Post
आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला  किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

आत्मा अंतर्गत महिला किसान दिनाचे औचित्य साधून महिला किसान दिवस व क्षेत्रीय किसान गप्पा गोष्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add