Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा , नंदुरबार येथील सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

team by team
October 23, 2021
in राजकीय
0
तर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा , नंदुरबार येथील  सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह  सर्व नगरसेवकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
नंदुरबार । प्रतिनिधी
नंदुरबार येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या  दालनात असभ्य वर्तणूक  करुन खुर्त्यांची तोडफोड  करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेच्या मुलावर कायदेशीर कारवाई करावी , व असभ्य वर्तन करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे , असा ठराव करीत सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह  सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे .
याबाबत काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , नंदुरबार नगरपरिषदेच्या कार्यलयात विरोधी पक्षाचे नगरसेवक कार्यालयीन वेळेत कार्यालयात येवून धुमाकुळ घालत असतात . यापूर्वी सुध्दा नंदुरबार नगरपरिषदे मुख्याधिकारी गणेश गिरी असतांना नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी व विरोधी नगरसेवक यांनी खुर्च्याची नासधुस केली होती . आता दि . 20 ऑक्टोंबर 2021 रोजी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेविकेचा पुत्र लक्ष्मण माळी व इतर नगरसेवकांनी खुर्च्या तोडून आरडाओरड केली तसेच शिवीगाळ केली . मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे हे याघटनेचे साक्षीदार असून त्यांच्या दालनातील तसेच नगरपालिकेतील सी.सी.टी.व्ही . कॅमेऱ्यातून सुध्दा याघटनेचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही . त्यामुळे नगरपरिषदेमध्ये शिवीगाळ करणाऱ्या , दादागिरीची भाषा करणाऱ्या सिंधुताई माळी , त्यांचा मुलगा लक्ष्मण माळी तसेच नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घ्यावा व असभ्य वर्तवणूक करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा , अशी मागणी केली . या निवेदनावर उपनगराध्यक्ष रवींद्र अशोक पवार , प्रमोद ओंकार शेवाळे , मेमन मनसा अगली , कुरेशी फहमीदा बानो दियाम , परवेज करामत खान यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .
दरम्यान , निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी लगेचच हा ठराव मंजूर करून नगरसेवकांसमवेत जाऊन भेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली . जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना सदर मंजूर झालेला ठराव सादर केला .
बातमी शेअर करा
Previous Post

शेती अवजारांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

जिल्हा पोलीस दलातील २ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची तत्परता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add