Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

team by team
May 8, 2026
in राज्य
0
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याकडे अध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय समितीची धुरा

 

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्यातील आदिवासी व दुर्गम भागांतील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६ मे २०२६ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे.

राज्यातील आदिवासी भागांमध्ये माता व बालमृत्यू, कुपोषण, सिकलसेल, अॅनिमिया, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण, तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता तसेच रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांतील अडचणी लक्षात घेऊन शासनाने यापूर्वी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, विविध विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा, स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांशी संवाद साधून सविस्तर अभ्यास केला होता. तसेच देशातील इतर आदिवासीबहुल राज्यांनाही भेटी देत तेथील उपाययोजनांचाही अभ्यास करण्यात आला होता.

समितीने सादर केलेल्या अहवालात आदिवासी भागांतील आरोग्य सेवा, पोषण, माता-बाल आरोग्य, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था, आरोग्य मनुष्यबळ, माहिती प्रणाली, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण व उपजीविका यांसारख्या विविध विषयांवर ठोस शिफारसी करण्यात आल्या आहेत. या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीच आता स्वतंत्र राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली असून, जळगाव, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. नाशिक मंडळाचे उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कपिल आहेर हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

सदर समिती राज्यातील सर्व १६ आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी कार्य करणार असून, आरोग्य सेवा, पोषण, सिकलसेल नियंत्रण, मनुष्यबळ उपलब्धता, आंतरविभागीय समन्वय यांसारख्या विषयांवर प्राधान्यक्रम निश्चित करून अंमलबजावणी प्रक्रियेचा नियमित आढावा घेणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार क्षेत्रभेटी, फोकस ग्रुप चर्चा, आढावा बैठका, उपसमित्या आणि अभ्यास गट स्थापन करण्याचे अधिकारही समितीला देण्यात आले आहेत.

दरमहा किमान एक बैठक घेण्यात येणार असून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली दर तीन महिन्यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून आदिवासी भागांतील आरोग्य सेवांमध्ये मूलभूत आणि दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

Next Post

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add