Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

team by team
March 18, 2026
in राजकीय
0
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना दरमहा २ हजार ५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यात हस्तांतरणाद्वारे (D.B.T. द्वारे) जमा होणार आहे. या वाढीव लाभासाठी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आणि आधार संलग्निकरण करणे अनिवार्य आहे, अशी माहिती नंदुरबारचे नायब तहसिलदार (संगायो) मदन कावळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

पूर्वीच्या अनुदानात १ हजार रुपयांची वाढ करून ते आता २ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील ५४४ आणि श्रावणबाळ योजनेतील ५७ लाभार्थ्यांचे युडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड अद्याप लिंक नसल्याचे समोर आले आहे.

सर्व संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी आपली युडीआयडी (UDID) कार्डाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड क्रमांक आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदि कागदपत्रे गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे किंवा तहसील कार्यालय, नंदुरबार (संजय गांधी योजना शाखा) येथे २० मार्च २०२६ पूर्वी सादर करावे. तसेच अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांनी दिव्यांग युडीआयडी (UDID) पोर्टलवरून आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्यावी.

दिव्यांग लाभार्थ्यांनी या वाढीव लाभापासून वंचित राहू नये, यासाठी मुदतीपूर्वी कागदपत्रे सादर करावीत, असेही आवाहन नायब तहसीलदार (संगायो) श्री. कावळे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

Next Post

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

Next Post
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add