नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील रायसिंगपुरा कोळी प्लॉट भागात रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.जयंतीचे औचित्य साधून नगरपालिकेने उभारलेल्या महर्षी वाल्मिक ऋषी प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नगरसेविका कल्याणी मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, सभापती प्रमोद शेवाळे, भावना गुरव, चेतन पाडवी, नगरसेवक कुणाल वसावे, दीपक दिघे, अर्जुन मराठे, सोमु गिरासे, गजानन पाटील, प्रा भास्कर कुवर, इंदास चित्ते, दिनेश चित्ते, आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाल्मिक जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कोळी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष घारू कोळी, उपाध्यक्ष दादा कोळी, सचिव रवींद्र चव्हाण, खजिनदार कमलेश कोळी, सदस्य सागर चित्ते, अर्जुन शिरसाट, उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चित्ते,अविनाश जाधव,पिंटू कोळी,निलू कोळी आदींनी परिश्रम घेतले.








