Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिवारपासून डायरेक्ट व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

team by team
October 21, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्हॉलीबॉलसाठी व्यासपीठ तयार व्हावे या उद्देशाने शनिवारपासून डायरेक्ट राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन महाजे (दिंडोरी )येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन, नाशिक जिल्हा महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन, आणि डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील महाजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवार पासून या स्पर्धा होत असून देशातील विविध राज्यांतील संघ यात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डी बी साळुंके यांनी दिली आहे. या वेळी प्राचार्य दिपक मोकल ,जनरल सेक्रेटरी,सरपंच महाजे वसंत रंगनाथ भोये , योगेंद्र दोरकर,राज्य संघटक शरद कदम उपस्थित होते.
दुर्गम भागात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब,हरियाना,चंदिगड,गुजरात,दिवदमण, उत्तराखंड,उत्तर प्रदेश,कर्नाटक,बंगाल,ओरिसा , आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मणिपूर, महाराष्ट्र,गोवा येथून येणाऱ्या खेळाडूंच्या ४० संघाची राहण्याची व्यवस्था ननाशी येथील आश्रमशाळेत केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम क्रमांक 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक 11 हजार आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. उद्घाटन समारंभाला विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ ,खा. हिना गावित , राष्ट्रीय अध्यक्ष विपीन चहल ,महासचिव विक्रम सिंह उपस्थित रहात आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मनसेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची पुनश्चः नियुक्ती

Next Post

हॉटेलात सापडले ५०० लिटर बनावट इंधन ऑईल, एकाविरुद्ध कारवाई,

Next Post
हॉटेलात सापडले ५०० लिटर बनावट इंधन ऑईल, एकाविरुद्ध कारवाई,

हॉटेलात सापडले ५०० लिटर बनावट इंधन ऑईल, एकाविरुद्ध कारवाई,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add