नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले.सध्या थंडीच्या कडाका सुरू असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळ तर्फे रनाळा,मांजरे, कोपरली, बह्याने, सातुरखे,आराळे,ओसरली,अमळथे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप झाल्याने चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
स्वेटरचे वाटप जि.प माजी उपाध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवार,दि.9 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे यांनी केले.कडाक्याच्या थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे आणि माणुसकीची ऊब मिळावी या उद्देशाने नंदुरबार तालुक्यातील पुरपट्ट्यातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी शेतकी संघ अध्यक्ष बी.के पाटील, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक देवमन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर पाटील,पंचायत समिती माजी सदस्य संतोष धनगर,भालेरचे माजी सरपंच गजानन पाटील, बाजार समिती संचालक अनिल गिरासे, बलदाण्याचे माजी सरपंच किरण पाटील तसेच विविध गावातील सरपंच,उपसरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष द्या*
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या परिस्थितीनुसार अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची असेल तर पहिल्यांदा शिक्षण विचारात घेतले जातं. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व दिलं पाहिजे. भविष्यात पुढे जाण्यासाठी चांगलं शिक्षण घ्यावं. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत.









