नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथे एकाच रात्री तीन दुकानात चोरी झाली होती. पोलिसांनी कारवाई करत आठ तासात दोंडाईचा येथून अटक केली आहे.
नवापूर शहरात एकाच रात्रीत तब्बल तिन दुकानांत चोरी करणारा सराईत चोरटा गणेश उर्फ अजय आसाराम कोळी वय यास काल नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रावण दत्त, एस,अप्पर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, विभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन तसेच नवापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल सोनवणे यांच्या नेतृत्वात नवापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोंडाईचा शहरातून काल ताब्यात घेतले.
पोलिसांच्या कामगिरीवर कायम ताशेरे ओढणाऱ्यांचा मुखवटा फाडत पोलिसांवर कायम तोंडसुख घेणाऱ्यांच्या कानशिलात नवापूर पोलिसांनी चांगलीच जबरदस्त चपराक दिली आहे.आधी खाकी नंतर बाकी म्हणत पोलिसांनी रेकॉर्ड ब्रेक कारवाई करत या चोरट्याला 8 तासांत जेरबंद करून पुन्हा महाराष्ट्र पोलिसांची मान अभिमानाने ताठ ठेवली आहे.नवापूर शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सुरक्षित रहावे म्हणून नवापूर पोलिस नेहमीच रात्रीची घालीत असतात.









