नंदुरबार l प्रतिनिधी-
के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई ता. जि. नंदुरबार येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
शालेय विज्ञान प्रदर आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी युवक क्रीडा विकास मंडळाच्या सचिव डॉ. विभूतीताई गावित ह्या उपस्थित होत्या.तर परीक्षक के.डी. भावसार व योगेश शिंपी, सैनिकी शाळेचे कमांडंट ले.कर्नल शशिकांत मराठे, प्राचार्य शरद पाटील हे उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयक आवड निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने विविधांगी कार्यक्रमात शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य शरद पाटील यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला.
प्रमुख अतिथी डॉ. विभूतीताई गावित यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगून विज्ञान प्रदर्शनाचा आयोजनाबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी ‘ विज्ञानाची ताकद आपल्याला समृद्ध करण्यासाठी आहे म्हणून विज्ञानाचा वापर हा फक्त विधायक कार्यासाठी झाला पाहिजे.’ असे मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनात विज्ञान, भूगोल आणि गणित या विषयातील 60 उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केलीत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करेले यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राचार्य शरद पाटील यांनी केले.सदर शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.









