मोलगी| प्रतिनिधी
बालकांमधील खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी पाडावपाडा, कात्री (ता.धडगाव) येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात १४५ बालकलाकार व २०३ खेळाडूंनी भाग घेतला. दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण व खरी खिलाडू वृत्ती दिसून आली.
सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन माजी जि.प.सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कात्रीचे सरपंच संदीप वळवी होते. तर माजी पंचायत समिती सदस्य सविता पाडवी, दिलीप पाडवी, गटशिक्षणाधिकारी डी डी. राजपूत, विस्तार अधिकारी डी.एम.चित्ते, केंद्र प्रमुख शंकर वसावे, माजी सरपंच बारकीबाई वळवी, सेमट्या वळवी यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान सर्व विजेत्या संघाचा पदके व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
क्रीडा स्पर्धांचा निकाल
कबड्डी
मुले: प्रथम- विजेता संघ जि.प.शाळा शेलखेडीपाडा
मुली: प्रथम- विजेता संघ जा.प.शाळा कामोदपाडा
खो खो
मुले: प्रथम- जि.प.शाळा शेलखेडीपाडा
मुली: प्रथम- जि.प.शाळा कामोदपाडा
अन्य मैदानी खेळांमध्ये जि.प.शाळा पडावपाडा, शेलखेडीपाडा, कामोदपाडा येथील विध्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला.
सांस्कृतिक कार्यक्रमात हानिपाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकवला तर बिलपाडा शाळेने द्वितीय बक्षीस मिळवले.









