Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महागाई विरोधात नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र शासनाचा निषेध

team by team
October 20, 2021
in राजकीय
0
महागाई विरोधात नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र शासनाचा निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र शासनाने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणाने देशातील जनता हैराण झाली आहे. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीत प्रचंड वाढ होत आहे. या वाढत्या महागाई विरोधात नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसे निवेदन कार्यकारी दंडाधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार बी.ओ.बोरसे यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष विजय (लल्ला मराठे) मराठे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, केंद्र शासनाने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणाने  देशातील जनता हैराण झाली आहे. त्यांच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे देशातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरीब, शेतमजूर, कामगारांचे जीवन जगणे मुश्किलीचे झाले आहे. आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे जनतेचे हातातील काम निघून गेले आहे. अशात केंद्राचे सरकार महागाई वाढवून नागरीकांना वेठीस धरत आहे. या सर्व प्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख यांच्या आदेशाने व राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत दादा मोरे यांच्या मार्गदर्शानाखाली व युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली देशातील पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या माध्यमातुन जिल्हाभरात केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे, याची दखल घेवून आपल्या स्तरावरुन वरिष्ठ पातळीवर आमचा निषेध नोंदविण्यात यावा, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदन देतेप्रसंगी शहराध्यक्ष विजय (लल्ला पहेलवान) मराठे, कार्याध्यक्ष कालु पैलवान, सरचिटणीस अमोल पिंपळे, संघटक जितेंद्र ठाकरे, शहर उपाध्यक्ष राजा ठाकरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोविड- 19’ नियमांचे पालन करून बंदिवान भेटू शकतील नातेवाईक व वकिलांना

Next Post

‘कोविड-19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्य देणार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची माहिती

Next Post
कोविड- 19’ नियमांचे पालन करून बंदिवान भेटू शकतील नातेवाईक व वकिलांना

‘कोविड-19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्य देणार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add