नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर-सुर रस्त्यावरील गुडलक टायर सर्व्हीस सेंटरच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलीसांनी छापा टाकून १४ लाख ३६ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, मोबाईल, वाहने, जुगाराचे साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी ४० जणांविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर-सुरत रस्त्यालगत गुडलक टायर सर्विस सेंटरच्या पाठीमागे एका बंदीस्त पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा ५२ पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गुडलक टायर सर्विस सेंटरच्या पाठीमागे बंदीस्त पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. शेडमध्ये लाकडी टेबलाभोवती खुच्यार्ंवर अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी छापा टाकून रईस (रा.नवापूर) , गुलामअली गुलामनबी दुधवाला (वय ५५ वर्षे, रा.नागरवडा कासम महाल, बडोदा गुजरात (क्लब मॅनेजर), दिलीपभाई कासमभाई टेलर (वय ५७ वर्षे, रा.अंबाजी रोड, हनुमान सेरी, सुरत गुजरात), योगेश अनिलभाई सुचक (वय ६५ वर्षे, रा.आकाश रो हाऊस, पांडेसरा, सुरत गुजरात), धनसुकभाई जडूभाई डिमर (वय ७१ वर्षे, रा.धनदेवो माछीवाडा, नवसारी गुजरात), हिमांशू मुकेश दोडीया (वय-२८ वर्षे, रा.वाकीवाडा, नवापूर), पप्पू जयलाल शहा (वय ३३ वर्षे, रा.वापी चला स्वामी नारायण शाळेशेजारी गुजरात), प्रकाश सुंदरलाल यादव (वय ५३ वर्षे, रा. नेहरु गार्डन मागे, नवापूर), हितेश मोतीलाल पटेल (वय ५४ वर्षे, रा. ग्रिनसिटी, पाल सुरत), जोसेफ वरकी किइ एकेकाडावील (वय- ७४ वर्षे, रा. बालादेवी, आनंदनगर सोसा. गांधी रोड, बारडोली), इकबाल अब्दुलमिया शेख (वय ५८ वर्षे, रा. वरीयाली बाजार, सयद वाडा, सुरत), मोहम्मद सलीम बहुद्दिन अन्सारी (वय- ४८ वर्षे, रा. प्लॉट नं. ४०३ रानी क्लब, सुरत), नरेशकुमार श्रीचंद्र सिंग (वय- २५ वर्षे, रा.टिकेथ जि. हाथरस, उत्तरप्रदेश) मुन्ना सुरेश सहा (वय ३० वर्षे, रा.चाला बापी, गुजरात), रामरतन रामआधार शर्मा (वय ६० वर्षे, रा. काझीटोला, ता.बबेरु, जि. चित्रकुट उ.प्र.), अल्लारखु मोहम्मद पाटीया (वय- ५१ वर्षे, रा.सयद स्ट्रीट पार्डी किल्ला, वलसाड, गुजरात), जतिन बालकीशन चांडक (वय ३१ वर्षे, रा. अमिदरा अपार्टमेंट, वापी, गुजरात), छोटू बहुदीन मन्यार (वय-५९ वर्षे, रा. अलीफनगर, झोपडपट्टी, सोनगड, गुजरात), शेख मकबुल गुलाम मोहम्मद (वय ४९ वर्षे, रा. न्यु. कसक नगर, रेल्वे स्टेशनच्या मागे, भरुच, गुजरात), शेख अस्लम शेख हारुन (वय-४९ वर्षे, रा. गल्ली नं.०६, मीटीखाडी फुलवाडी, सुरत, गुजरात), दीपकभाई मधुभाई पटेल (वय ५३ वर्षे, रा.१०१ वास्तु रेसिडेन्सी, योगी चौक, सुरत), अजयकुमार चंभुभाई गोरास्वा (वय- ३१ वर्षे, रा.गल्ली नं १० भगीरथ नगर, सुरत), प्रदीप शंकर वळवी (वय- ५५ वर्षे, रा.पाटीबेडकी, ता.नवापुर), पुरुषोत्तमभाई गोविंदभाई देवपुंजक (वय ५२ वर्षे, रा.लक्ष्मण नगर, सूरत), इरफान अब्दुल कादोरशेख (वय- ४२ वर्षे, रा.घनदेवी नवीनगर, नवसारी), संजय लालजीभाई सोजित्रा (वय- ३५ वर्षे, रा.२०२ ओपेरा पॅलेस, लस्काना, सुरत), क्रुशांक रतिलाल ठाकुर (वय- ५४ वर्षे, रा.१/४४९, दजीसेरी शेजारी, नानपुरा, सुरत), भावेशभाई कल्लुभाई वसोया (वय- ४४ वर्षे, रा.७०१ सनसिटी रेसिडेन्सी, अमरोली, गुजरात), आदमभाई सुलेमानभाई जेठवाह (वय- ४५ वर्षे, रा. १०६ रामपुरा, पेट्रोलपंप, सुरत), मोहम्मद इरफान अब्दुला मिया शेख (वय ५१ वर्षे, रा.११/२३३७ मरजान सामी रोड, खजुरावाडो, सुरत, गुजरात), अश्पाक रफिक काझी (वय ५३ वर्षे, रा. बुध सोसा. मदीना मशिद, उधना, सुरत), दिपककुमार गोवर्धनदास लालवाणी (वय ३६ वर्षे, रा. साईरचना सोसा. २१८ बी, सुरत), रोख सलीम कासम शेख (वय ६१ वर्षे, रा. १९३ जमादार मोहल्ला, धनदेवी, ता.जि. नवसारी), रौफ शहा हसन शहा (वय ४९ वर्षे, रा.न्यू टेनामेंट, जी १२, उमरवाडा, सुरत), धर्मेश धनसुखभाई पंचाल (वय- ४५ वर्षे, रा. दयापार्क सोसा. बी २ ता. मांडवी जि.सुरत), दिलीप शंकर पारधी (वय- ४४ वर्षे, रा. घर नं. २०, डेडीयापाडा, गुजरात), संजयभाई देवसिभाई बलदानिया (वय- ५१ वर्षे, रा. मुक्तोधाम सोसा. ३९ पर्वतपाटीया, सुरत), गुलाम ख्वाजा रसुलभाई भटीयारा (वय- ६१ वर्षे, रा.घर नं. १०८६, वसंत टॉकीज गल्ली, सुरत), मोहम्मद हानिफ अब्दुल गनी शेख (वय-५७ वर्षे, रा. १३३५ वरीयाली बाजार, सुरत), बकुलभाई नटवरभाई पटेल (वय- ४३ वर्षे, रा. ४०८, कैलास रोड, सेटीयानगर ग्रामपंचायत, वलसाड) हे ५२ पत्त्यांचा झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांच्याकडून १४ लाख ३६ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, मोबाईल, वाहने, जुगाराचे साहित्याचा समावेश आहे. त्यांच्यावर नवापर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, असई विजय सोनवणे, पोहेकॉ मुकेश तावडे, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, पोकॉ अभय राजपुत, राजेंद्र काटके, सतिष घुले, राहुल तडवी, पवन पाटील यांच्या पथकाने केली.








