नंदुरबार l प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. येथील का. वि. प्र. संस्था, भालेर संचलित द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री,आ. डॉ. गावित हे मार्गदर्शन केले.
अत्यंत उत्साही, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात मोठ्या थाटात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता व सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह नृत्याने करण्यात आली. नृत्यप्रस्तुतीनंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते हवेत रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर आनंद, उत्साह व सकारात्मकतेने भारावून गेला. या आकर्षक प्रारंभाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. विजयकुमार गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा. ज. प. तालुकाध्यक्ष दीपक पाटील होते.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, भालेरच्या माजी सरपंच सौ. बेबीताई पाटील, विद्यमान सरपंच सौ. कविता पाटील, काकरदेचे राकेश माळी, विठोबा माळी, प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. डी. पाटील सह शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक गीतांवर आधारित एकल नृत्य, समूह नृत्य, देशभक्तीपर गीतांवरील सादरीकरणे तसेच नाट्यछटा सादर केल्या. विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषा, तालबद्ध हालचाली व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
विविध उपक्रमाचे माहिती. कार्यक्रमादरम्यान एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देणारे व्हिडिओ सादर करण्यात आले. यामध्ये वृक्ष दिंडी, पर्यावरणपूरक गणपती, स्वच्छता अभियान, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी यासाठी ‘गुड टच – बॅड टच’ विषयावर आधारित जनजागृतीपर व्हिडिओ दाखविण्यात आले. या उपक्रमांचे पालक व उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
शाळेशी संलग्न असलेल्या श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर येथे वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचेही व्हिडिओ सादर करण्यात आले. यामध्ये शालेय विज्ञान प्रदर्शन, एन.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांची माहिती देण्यात आली.
वर्षभरात विविध सण-उत्सव व उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता कला, क्रीडा, संस्कार व सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी व प्रशांत धनगर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक वाटचालीला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








