नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील युनियन बॅक ऑफ इंडीयाच्या शाखेत मालमत्ता तारण ठेवुन सदर तारण मालमत्ता बेकायदेशीरपणे इतरांना विक्री करुन बॅकेची 4 कोटी 59 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पती पत्नी सह तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्या विरूद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील युनियन बॅक ऑफ इंडीयाच्या घी बाजार शाखेत
सन 2008 ते सन 2018 पर्यंत संशयीत आरोपी रविंद्र काशिराम मराठे, सुरेखा रविंद्र मराठे दोन्ही रा – महाराष्ट्र व्यायाम शाळा, नंदुरबार यांनी त्यांची मालमत्ता युनियन बँक ऑफ इंडीया शाखा नंदुरबार येथे मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली त्यानंतर मालमत्ता या बँकेकडे तारण नसल्याचे भासवुन तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक, नंदुरबार, तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्याशी संगनमत करुन बेकायदेशीरपणे इतरांना विक्री करुन 4 कोटी 59 लाख
बॅकेत न भरता फसवणुक केल्याप्रकरणी युनियन बॅक ऑफ इंडीयाचे शाखाधिकारी भटुसिंग शामसिंग ठाकुर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रविंद्र काशिराम मराठे, सुरेखा रविंद्र मराठे दोन्ही रा – महाराष्ट्र व्यायाम शाळा, नंदुरबार, तत्कालीन सर्व दुय्यम निंबधक नंदुरबार व तत्कालीन सर्व तलाठी नंदुरबार यांच्या विरूद्ध भादवी कलम 420, 406, 467, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमकर करीत आहेत.








