Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकअदालतीत ४११ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा;२ कोटी ८२ लाखांची तडजोड; पाच पती-पत्नी वादांत समेट

team by team
December 14, 2025
in राज्य
0
राष्ट्रीय लोकअदालतीत ४११ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा;२ कोटी ८२ लाखांची तडजोड; पाच पती-पत्नी वादांत समेट

नंदुरबार l प्रतिनिधी-

राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने आज (१३ डिसेंबर २०२५ ) रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीद्वारे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चविरहित न्याय मिळाला.

या राष्ट्रीय लोकअदालतीच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. एच. कर्वे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सतीश टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी के. ए. नहार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सौ. ए. एस. वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र बी. पाटील, तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. भिर्डे, आर. बी. सुर्यवंशी व एच. वाय. पठाण, नंदुरबार जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सावंत वळवी, सचिव अ‍ॅड. सारंग गिरनार, सहसचिव अ‍ॅड. मोहनसिंग गिरासे यांच्यासह जिल्ह्यातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लोकअदालतीत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण ४११ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणांतून एकूण ₹२,८२,६३,७२९ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.

लोकअदालतीदरम्यान पती-पत्नी वादाच्या पाच प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संबंधित जोडप्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. या तडजोडीसाठी दोन्ही बाजूंच्या विधिज्ञांनी सहकार्य केले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर यांनी संबंधित पक्षकारांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक डी. पी. सैंदाणे, अधिक्षक जे. वाय. सानफ, अधिक्षक जी. यू. भामरे, न्यायालयीन कर्मचारी तसेच विधिज्ञांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकअदालतीमुळे न्यायालयांवरील ताण कमी होऊन नागरिकांना त्वरित न्याय मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिक व कुटुंबीयांसाठी योगदान सर्वांची जबाबदारी; डॉ. मित्ताली सेठी

Next Post

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

Next Post
नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

नंदुरबार शहरातील वाढीव व अतिरिक्त घरपट्टीची सक्ती रद्द करा ,उबाठा गटाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add