नंदुरबार l प्रतिनिधी-
ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, आणि ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), आणि एसएमएस/व्हॉट्ॲप (SMS/WhatsApp) याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकपासून नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*फसवणूक करणारे सहसा खालील प्रकारचे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढतात:*
• “आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी” आणि अनधिकृत पेमेंट लिंक पाठवणे.
• वाहन चालविण्याचा परवाना (“DL”) सस्पेंड होणार आहे, त्वरित तपासणी करा” असे संदेश पाठवणे.
• “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan_Pay.apk” अशा नावाच्या अनधिकृत APK ॲप्स/फाईल्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करणे.
*महत्त्वाची सूचना*
• उप प्रादेशिक कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलवर कधीही व्हॉट्ॲप (WhatsApp) द्वारे पेमेंट लिंक पाठवली जात नाही.
• अनोळखी स्त्रोतांकडून आलेल्या APK फाईल्स डाउनलोड करू नका, कारण यामुळे ओटीपी (OTP), बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाऊ शकतो.
*सर्व वाहन चालक/मालक यांनी केवळ परिवहन विभागाच्या खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा:*
• वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in
• ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in
• परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in
• ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in
ही सर्व अधिकृत संकेतस्थळे “gov.in” ने समाप्त होतात. “.com”, “.online”, “.site”, “.in” अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइटवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये किंवा ती उघडू नये.
*नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ खालील ठिकाणी तक्रार नोंदवावी.*
• National Cyber Crime Portal: https://www.cybercrime.gov.in
• सायबर फसवणूक हेल्पलाईनः 1930
• जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन








