Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

team by team
December 5, 2025
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीदत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता आज भक्तिमय वातावरणात करण्यात आली. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक उपक्रमाचा आज सत्यदत्त पूजनाने विधिवत समारोप करण्यात आला.

श्री स्वामी समर्थांच्या चरणी नमन करून सेवेकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने सत्यदत्त पूजन पार पडले. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची नैवेद्य आरती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच सेवेकरी व भाविकांची गर्दी केंद्रात दिसून आली.
अखंड नामजप सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, स्वामी समर्थांचे अभंग, स्तोत्रांचा सामूहिक जप,होम हवन, ध्यान साधना सेवा केंद्रात पार पडली.

श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित अखंड नामजप यज्ञ सप्ताहात नंदुरबार शहरासह तालुक्यातील असंख्य सेवेकरींनी गुरुचरित्र पाराण्याच्या सेवेत सहभाग घेतला. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ मंत्र जप 56 लक्ष 14 हजार 596 एवढे झाले तर, श्री नवार्णव मंत्र जप 4 लक्ष 64 हजार 184 ,श्री गायत्री मंत्र जप ,3 लक्ष 34 हजार 908 ,श्री महामृत्युंजय मंत्र जप ,2 लक्ष 84 हजार 40, श्री रुद्र पाठ 79, दुर्गा सप्तशती पाठ ,254 श्री स्वामी समर्थ सारामृत पाठ 441, श्री मल्हारी सप्तशती पाठ 157 यासह श्री गणेश व मनोबोध याग, नवचंडी याग , रुद्र याग ,गीताई याग श्री स्वामी समर्थ याग ,एवढी सेवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सप्ताह दरम्यान करण्यात आली.

तसेच 5 जानेवारी रोजी उज्जैन येथे श्री महाकाल मंदिर येथे लिंगारचन सोहळा पार पडणार आहे या बद्दल उपस्थित सेवेकरींना माहिती देण्यात आली. या सांगता सोहळ्याने या आध्यात्मिक सप्ताहाला मंगलमय पूर्णविराम मिळाला.या सप्ताहात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सर्व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने येत्या वर्षातही अशा धार्मिक उपक्रमांना उत्साहाने सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

Next Post

बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा: उत्तम जाधव

Next Post
बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा: उत्तम जाधव

बनावट वेबसाईट,ॲप्स आणि लिंक्सपासून सावधगिरी बाळगा: उत्तम जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add