श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक विद्यालयाच्या सौर जलतापक उपकरणास इन्स्पॉयर अवॉर्डमध्ये विजेता उपकरणाची राज्यस्तरावर निवड
नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर ता.. नंदुरबार येथील श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौर जलतापक अभिनव वैज्ञानिक उपकरण थेट इन्स्पॉयर अवॉर्ड २०२३_२४ मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जाऊन गावाचे व शाळेचे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्वल केले आहे.
विज्ञानातील कल्पकतेला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम घेऊन हे यश म्हणजे शाळेसाठी व जिल्ह्यासाठी मामाचा तुरा होय.
या उपकरणात दाखवलेली वैज्ञानिक समज, तंत्रज्ञानाची जाण आणि समस्यांवरील कल्पकता व उपाय पाहून परीक्षकही प्रभावित झाले. शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आता हे स्पर्धेत राज्यस्तरावर भालेर व नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून पुढे राष्ट्रीय स्तराचा मार्गही खुला होणार आहे.
तसेच का.वी. प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील कार्याध्यक्ष विजय बोरसे व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सह प्राचार्य पी.एस.सुर्यवंशी व पर्यवेक्षक पी.डी.पाटील सह विद्यालयातील सर्व शिक्षकयांनी अभिनंदन केले विज्ञान शिक्षक ए.एस.पटेल सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले व विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
उपकरणाचे नाव _सौर जलतापक_उपयुक्तता घरगुती वापर, औद्योगिक क्षेत्रात, शाळा, हॉस्पिटल, होस्टेल साठी उपयुक्त सतत व मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या गरम पाण्यासाठी उपयुक्त .ऊर्जा बचत व आर्थिक फायदा विद्युत किंवा गिझरचा खर्च वाचतो. देखभाल खर्च कमी आयुष्यमान जास्त पर्यावरण पूरक उपकरण १०० टक्के नवी नवीकरणीय उर्जेवर आधारित असल्याने कार्बन उत्सर्जन कमी .हरित ऊर्जा वापरास प्रोत्साहन ग्रामीण व दुर्गम भागासाठी अत्यंत फायदेशीर विज नसली तरी केवळ सूर्यप्रकाशाने भरपूर गरम पाणी उपलब्ध होते.








