Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी

team by team
November 17, 2025
in राज्य
0
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत बोकळझर, कळंबू ग्रामपंचायतींची तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्ह्यात प्रथम व द्वितीय आलेल्या अनुक्रमे बोकळझर ता. नवापूर   व कळंबू ता. शहादा या ग्रामपंचायतींची जळगाव जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विभागस्तरीय तपासणी केली.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जल जीवन  मिशनचे प्रकल्प संचालक आय. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नंदुरबार जिल्ह्यात बोकळझर ता. नवापूर या ग्रामपंचायतीने प्रथम तर कळंबू ता.शहादा या ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची विभागस्तरीय तपासणी करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक राहुल जाधव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषिकेश भदाणे,समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास  यांच्या समितीने दोन्ही गावांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देविदास देवरे,सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित ,शहादा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड, क्षमता बांधणी तज्ञ योगेश कोळपकर ,समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समितीने ग्रामपंचायत अंतर्गत शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन तेथील वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाची पाहणी केली. समिती चे अध्यक्ष राहुल जाधव यांनी उपस्थित ग्रामस्थांना अभियानाविषयी मार्गदर्शन करून गावातील स्वच्छतेची शाश्वतता कायम ठेवणे बाबत आवाहन  केले.
याप्रसंगी  बोकळझर सरपंच सौ. सुमन गावित, उपसरपंच अमित गावित, राहुल गावित, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची, डॉ. अनिल वळवी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी  गणेश गावित तसेच  कळंबू येथील सरपंच रामराव बोरसे,  उपसरपंच हिरालाल देवरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता  पावरा, हरीश भोई, विस्तार अधिकारी बी. के. पाटील, उपभियंता महेंद्र नाईक  गटशिक्षणाधिकारी योगेश साळवे, ग्रामपंचायत अधिकारी बी. ए. पाटील,
केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आदिसह  ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील ,पदाधिकारी ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर ,स्वच्छतागृही कर्मचारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध

Next Post

हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल : पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add