धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील धनाजे बुद्रुक येथे खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला २ योजनेंतर्गत १ हजार ५०० लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार डॉ . विजयकुमार गावित , जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया गावित , माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पराडके ,माजी जिल्हा परिषद सदस्या नीलिमा पावरा, मुकेश वळवी,चंदू पावरा, हिराताई पाडवी आदी उपस्थित होते.
यावेळी खा. डॉ. हिना गावीत म्हणाल्या की, तळागळातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी संसदेमध्ये सातत्याने मागणी करत चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे घर धूरमुक्त घर व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना पुन्हा सुरू झाली आहे . प्रत्येकाला गॅस जोडणी देण्यात येणार आहे, केंद्र सरकारचा विविध योजने अंतर्गत घरगुती रोजगार उपलब्ध व्हावा या साठी शिवण काम,पापड बनवणे,लोणचे बनवणे अशा विविध कामासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊ असे प्रतिपादन खासदार डॉ . हिना गावित यांनी केले .
केंद्रातल्या विविध योजना महिलांसाठी राबवणार असल्याचे आमदार डॉ . विजयकुमार गावित यांनी सांगितले.
इंडेन गॅस एजन्सी धडगाव,हनुमान गॅस एजन्सी कात्री,भारत गॅस एजन्सी धडगाव यांच्या अंतर्गत १ हजार ५०० लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.