नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपचे खंदे समर्थक शितलकुमार पटेल यांच्यासह तालुक्यातील पातोंडा,जांभोली, करजकुपा,कोळदे, शिंदे,लहान शहादा, खोडसगाव,पळाशी येथील असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला.यावेळी संपर्कप्रमुख,आ.चंद्रकांत रघुवंशी सर्वांचे स्वागत केले.
नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला असून,आता खऱ्या अर्थाने मोर्चे बांधणीला वेग आला आहे.शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरूच आहे.
बुधवारी सायंकाळी नंदुरबार येथील भाजपाचे खंदे समर्थक शितलकुमार पटेल यांच्यासह पंचक्रोशीतील गावांमधील असंख्य शेतकरी व ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगरसेवक किरण रघुवंशी, रविंद्र पवार,अतुल पाटील, भरत पटेल,राजू पटेल,श्रीराम पटेल, हिरालाल पटेल इत्यादी उपस्थित होते.








