नंदुरबार l प्रतिनिधी-
शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणाऱ्यांचा सिलसिला जारी असून शनि मंडळ तीलाली, तलवाडे आणि ईंद्रहट्टी परिसरातील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेला आजचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे.
भाजपात डॉक्टर हिनाताई गावित यांचे पुनरागमन होताच अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघा पाठोपाठ नंदुरबार तालुक्यातीलही शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी चालवली आहे. आजच्या पक्षप्रवेशातून त्याचे चित्र पाहायला मिळाले. भाजपात प्रवेश घेतलेल्यांमध्ये तिलाली माजी सरपंच तिलाली NTVS संस्थेचे माजी संचालक संतोष उत्तम पाटील,माजी सरपंच तिलाली पितांबर सावंत,लोटन पाटील, रघुनाथ पाटील, पप्पु शिरसाठ, साहेबराव पाटील, साहेबराव ठेलारी, राजु ठेलारी, देवराम ठेलारी, आत्माराम सावंत, निलेश माळी, नाना श्रीराम पाटील, शांतीलाल पाटील,बाळू पाटील, आबा व्यंकट पाटील, भगवान डीगंबर पाटील, राजेंद्र पाटील, वासुदेव माळी, शेखर पाटील, इलियास खाटीक , जयेश गोरख पाटील, निलेश विष्णू पाटील, योगेश पाटील, कुणाल पाटील, सुरेश चैत्राम पाटील, सचिन कोळी, रावसाहेब पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मगरे, उपसरपंच तिलाली उत्तम गुलचंद भिल, माजी उपसरपंच तिलाली छोटू भिल ,
भैया कोळी, गोविंदा पाटील, हर्षल पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक युवराज पाटील आणि अन्य कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार महा संसद रत्न डॉ. हिनाताई गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे शिवसेना शिंदे गटात मोठे खिंडार पडले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुन्ना पाटील, सागर भाऊ तांबोळी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.








