Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगावचा शेतकऱ्यांचा आक्रोश,मुसळधार पावसाने पिके वाहून गेली; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

team by team
November 1, 2025
in सामाजिक
0
धडगावचा शेतकऱ्यांचा आक्रोश,मुसळधार पावसाने पिके वाहून गेली; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

धडगाव l प्रतिनिधी-

मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पावसाच्या तडाख्यामुळे उभ्या पिकांना कणीस उगवले असून ती पिके पाण्यात भिजून सडण्याच्या मार्गावर आहेत. तर आधीच कापून ठेवलेली पिके पुन्हा उगवून नंतर कुजल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. संततधारेमुळे शेतात पाणी साचले असून जमिनीवर चिखलाचे थर जमा झाले आहेत. अनेक ठिकाणी पिकांची मुळे पूर्णपणे कुजली असून *उत्पादनाची सर्व आशा संपुष्टात आली आहे.

या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेसह स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नेटवर्कच्या अडचणींमुळे अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून पिक पाहणी अद्याप झालेली नाही.त्यामुळे नुकसानाचे अचूक मूल्यमापन झालेले नाही. तसेच वनपट्टा हक्कधारक शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सरपंच परिषदेने धडगाव तालुक्याला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना सादर केले आहे.

शेतकऱ्यांचा आक्रोश

“आमचं पीक पावसात कुजून गेलं, आता आमचं जगणंच अवघड झालंय. सरकारने लगेच मदत न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,”

— तेगा पावरा, स्थानिक शेतकरी

“धडगाव तालुक्यातील बहुतांश शेतांमध्ये सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिके पावसाच्या पाण्यात सडली आहेत. अनेक शेतांमध्ये पिकांची मुळे कुजली असून उत्पादनाची सर्व आशा संपली आहे. त्यामुळे तातडीने तलाठी, कृषी अधिकारी व पंचायत समितीमार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.
अर्जुन पावरा
उपाध्यक्ष धडगाव तालुका सरपंच परिषद सरपंच ग्रा.प. भुजगाव

“शेतकऱ्यांचे सर्वस्व कुजून गेले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा, अन्यथा सरपंच परिषद शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल,”

ॲड. वसंत वळवी अध्यक्ष धडगाव तालुका सरपंच परिषद सरपंच ग्रा.प. झूम्मट

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

Next Post

एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

Next Post
एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add