Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक देवुन सन्मान

team by team
November 1, 2025
in क्राईम
0
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक देवुन सन्मान

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचा केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक देवुन सन्मान

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना ” केंद्रीय गृह मंत्री दक्षता पदक ” बहाल करून सन्मानीत करण्यात आले.

सेलु पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील गुन्हा रजि. क्र. 120/2021 भा.द.वि. कलम 304 (अ), 279, 427 प्रमाणे दाखल अपघातच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्हा हा प्रथमदर्शनी अपघाताचा असल्याचे दिसून येत होते. वैद्यकीय अधिकारी यांनी मरणाचे कारण देखील अपघात असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त. एस यांना मयताची पत्नी व सेलु येथील एका इसमा सोबत झालेले संभाषण सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाले. त्यावरुन त्या दोघांमध्ये अनैतीक संबंध असल्याचा संशयावरुन गुन्ह्यातील साक्षीदार, परिस्थिती जन्य पुरावा व भौतीक पुरावे या आधारे त्यांनी मयताची पत्नी व संबंधीत इसम यांच्यातील एकमेकांशी असलेले अनैतीक संबंध निष्पन्न झाले व मयत हा त्यांच्या संबंधात अडथळा असल्याचे आरोपीला वाटायला लागले.

त्यामुळे आरोपी याने त्याच्या इतर 3 साथीदारांच्या मदतीने खुनाचा कट रचुन अपघाताचा बनाव केला व मयतास ट्रकने ठोस मारून अपघात केला असा बनाव रचला, परंतू तो अपघात नसून खुन असल्याचे तपास अधिकारी यांनी निष्पन्न केले. त्यांनी त्याअनुषंगाने आपल्या तपासाचे चक्र फिरवले असता आरोपी विरुध्द खूनाचा गुन्हा निष्पन्न केला.

त्यावरुन नमुद गुन्ह्यात भा.दं.वि. कलम 302, 120(ब), 201 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. नमूद गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी कौशल्यपुर्वक तांत्रिक विश्लेषण, भरभक्कम पुराव्यासह तपास केल्याने गुन्ह्यातील आरोपीतास सश्रम कारावासाची दुहेरी जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा झाली त्यांच्या अश्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल त्यांना “केद्रीय गृह मंत्री दक्षता पदक” बहाल करून सन्मानित करण्यात आले आहे

बातमी शेअर करा
Previous Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त,केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ

Next Post

कबचौउमवितर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान,केळी उत्पादकांची आर्थिक – सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन

Next Post
कबचौउमवितर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान,केळी उत्पादकांची आर्थिक – सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन

कबचौउमवितर्फे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांना पीच. डी. प्रदान,केळी उत्पादकांची आर्थिक - सामाजिक स्थिती दाखवणारे हे एकमेव व्यापक संशोधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add