नंदुरबार | प्रतिनिधी
आमदार पंचायत राज समिती दौर्याला उद्या दि.२० पासुन सुरवात होणार आहे. दि. २२ पर्यंत जिल्ह्यात असनार आहे.या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात येत आहे.सन २०१६-१७ सह विविध कालावधीतील जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प.अंतर्गत तसेच पं.स.अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा कमिटी घेणार आहे.या कमिटीत 31 सदस्य आहेत.तसेच सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर असणार्या अधिकारी, कर्मचार्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून अपूर्ण असलेले रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी दमछाक होत असल्याचे चित्र सद्यस्थितीत पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प.अंतर्गत तसेच पं.स.अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी उद्या दि.२० रोजी पंचायत राज समिती नंदुरबार जिल्हा दौर्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर जि.प.प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. पंचायत राज समिती सन २०१६-१७ सह विविध कालावधीतील आढावा घेणार आहे. गेल्या महिन्याभरापासून अपूर्ण असणारे रेकॉर्ड, अभिलेखे पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचार्यांची धावपळ सुरु आहे.नुकताच महिला व बालकांचे हक्क समिती, निती आयोगाकडून जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला आहे. यामुळे कधी नव्हे ते जि.प.सह पं.स.प्रशासन अपटूडेट होत आहे. तर आता पंचायत राज समिती जिल्हा दौर्यावर येत असल्याने उर्वरित कामे देखील पूर्ण करण्यात येत आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून रंगरंगोटीच्या व दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असणार्या इमारतींचेही भाग्य उजळले आहे. एरवी जि.प., पं.स. व ग्रा.पं.च्या कामांमध्ये अनियमितता असली तरी समितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच अपटूडेट होत आहे. पंचायत राज समितीकडून विविध विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याने अधिकारी, कर्मचाार्यांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे.दरम्यान, इमारती, परिसर चकाचक करण्यात येत असला तरी जि.प.अंतर्गत गेल्या काही वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजना, उपक्रमांमध्ये अनियमितता असल्याने त्याचा आढावा समितीने नि:पक्षपातीपणे घेतल्यास पितळ उघड होण्याची शक्यता आहे.
हे सदस्य घेणार आढावा
आमदार प्रदीप जयस्वाल , आमदार कैलास पाटील घाडगे , राहुल पाटील , अनिल भाईदास पाटील , संग्राम जगताप , दिलीपराव बनकर , शेखर निकम , सुभाष धोटे , माधवराव जवळगावकर , प्रतिभा धानोरकर , हरिभाऊ बागडे , डॉ . विजयकुमार गावित , डॉ . देवराव होळी , कृष्णा गजबे , राणा जगजितसिंह पाटील , प्रशांत बंब , मेघना बोर्डीकर , किशोर जोरगेवार , अंबादास दानवे , विक्रम काळे , अमरनाथ राजूरकर , निरंजन डावखरे , सुरेश धस तसेच विधान परिषदेचे सात निमंत्रित सदस्य आमदार बुधवारपासून जिल्ह्यात येणार आहेत .