नंदुरबार l प्रतिनिधी-
शासनाने नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 54 लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंट मध्ये जमा होणार असून 931 शेतकरी या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते व त्यांचे 445 हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले होते.
डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तातडीने प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन जात, धर्म, पक्ष न पाहता शासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.
शासकीय यंत्रणेने भर पावसात शेत बांधावर जाऊन पंचनामे ही तातडीने केले होते.
या सर्व परिस्थितीचा शासनाने साकल्याने दखल घेऊन नंदुरबार जिल्ह्यासाठी सुमारे 53 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खातावर परस्पर जमा होणार आहे.
आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री महसूल मंत्री व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री यांचे आभार मानले असून ऐन दिवाळीच्या वेळेस संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत केल्याबद्दल शासकीय यंत्रणेलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.