नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद संदानशिव होते.
विद्यालयातील आकाश तडवी व खुशाल पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उत्स्फूर्त वाचन स्पर्धेत श्याम पावरा, हितेश कोळी, वीर पावरा, हर्षल वाडीले, निखिल वसावे, चिन्मय पाटील, प्रणव धनगर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.वरील स्पर्धकांपैकी श्याम पावरा प्रथम हितेश कोळी द्वितीय तर हर्षल वाडीले हा विद्यार्थी तृतीय क्रमांकाने यशस्वी ठरला. श्रीमती शुभांगी पाटील व श्रीमती नीलिमा पवार यांनी स्पर्धेत परीक्षण केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रल्हाद संदानशिव यांनी वाचनामुळे माणसात उच्च कोटीचे बदल घडून येत असतात म्हणून प्रत्येकाने वाचन केले पाहिजे असे मत व्यक्त केले. तर अध्यक्ष प्राचार्य पाटील यांनी डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रसंगाच्याआधारे वैचारिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगण्यासाठी वाचनाची आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र बांगर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुषमा गावित, रोहित पाटील यांनी प्रयत्न केले.