नंदुरबार l प्रतिनिधी-
शाळा तालुक्यातील वैजाली ते नांदेड दरम्यान असलेल्या वाकी नदीवरील पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावी या मागण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यादरम्यान रास्ता रोको करण्यात येणार होता त्याची दाखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्यावरील पुलाजवा पर्यायी रस्ता उभारण्यात येण्याचे आश्वासन दिले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आली.
शहादा तालुक्यातील वैजाली ते नांदर्डे दरम्यान असलेल्या वाकी नदीवर पुलाचे बांधकाम त्वरित न झाल्यास दिनांक 16 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याच्या इशारा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाला देण्यात आला होता. त्याची दखल घेत शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील,शाखा अभियंता निलेश पाटील, शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेत रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती केली व येत्या पंधरा दिवसाच्या आत तुटलेल्या पुला शेजारी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व नवीन पुलाचे काम लवकरात लवकर करण्याबाबत शासनाकडे तातडीने पाठपुरावा सुरू असून लवकरात नवीन प्रशस्त पुलाचे बांधकाम करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन परिसरातील वैजाली नांदर्डे तर्हावद खरवड येथील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांसमवेत पंचायत समितीचे माजी सभापती वीरसिंग ठाकरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच जितेंद्र चव्हाण, करणखेडा माजी सरपंच चुनीलाल पाटील, वैजाली सरपंच मणिलाल ठाकरे,प्रवीण पाटील,सतीश पाटील,माणिक चव्हाण, उत्तम ठाकरे ,दिलीप पाटील, राहुल बागुल, विनोद चव्हाण, शरद पाटील, सुभाष पाटील, मणिलाल पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.