शहादा l प्रतिनिधी-
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा पुरुषोत्तम चषक -२०२५ चे आयोजन शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सरदार पटेल सभागृहात उत्साहात संपन्न झाले.
सर्वप्रथम बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन दीपकभाई पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेच पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर बुद्धिबळ पटावर स्पर्धेतील सर्वात लहान वयाच्या खेळाडू धगधगे तेजस (वय ४ वर्षे), ठाकरे दर्शिका (वय ५ वर्षे) यांच्या सोबत बुद्धिबळ खेळून करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनीलभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविंद्र राऊळ, अनिल भामरे, रमाकांत पाटील, स्पर्धेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, प्रा.शोभराज खोंडे,प्रा.अश्वमेघराज खोंडे, प्रा.मणिलाल चौधरी तसेच मंडळाच्या विविध शाखांचे प्राचार्य उपस्थित होते.
बुद्धिबळ खेळल्याने जीवनात येणाऱ्या अनेक कठीण समस्या सोडवण्यास मदत होते, धोरणात्मक नियोजन,स्मरणशक्तीचा विकास आणि बळकटीकरण हे बुद्धिबळाच्या सर्वात आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. त्याच बरोबर नियमित बुद्धिबळाच्या सरावामुळे तुमची संज्ञानात्मक कार्ये सुधारू शकतात, तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक तीक्ष्ण आणि सतर्क होण्यास मदत होते. असे प्रतिपादन दीपकभाई पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले.
स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे आयोजन व नियोजन बघून आलेल्या खेळाडूंनी व खेळाडूच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. सदर स्पर्धा ही अकरा वर्षा आतील, पंधरा वर्षा आतील आणि खुला गट अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत धगधगे तेजस (वय ४ वर्षे), ठाकरे दर्शिका (वय ५ वर्षे) सर्वात छोटे खेळाडू होते तर सर्वात वयोवृद्ध खेळाडू पाडळदा येथील सेवानिवृत्त शिक्षक रविंद्र भबुता पाटील वय ७८ वर्ष आणि वडछिल ह.मु.नाशिक येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गिरिश नारायण पटेल वय ६४ वर्ष हे सर्वाधिक जास्त वयाचे खेळाडू सहभागी झाले होते.
त्यांचे विशेष सत्कार संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण बापूसाहेब दीपकभाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, अनिल भामरे समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.पटेल, प्राचार्य डॉ.सुनील पवार, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्राचार्य आर.एस.पाटील उपप्राचार्य डॉ.एस.डी. सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल, पर्यवेक्षक के.एच.नागेश, प्रा.ए.पी.पाटील, डॉ.अरविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत विजयी खेळाडूंना पुढीप्रमाणे बक्षिसे प्रदान करण्यात आले.
*स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे*
*खुला गट:-*
प्रथम:बोरसे वैभव (रोख ४०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), द्वितीय:सोनार ऋषिकेश(रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), तृतीय:शिंदे निशांत(रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ: सूर्यवंशी सुरज(रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा: सोनार सौरव(रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: परदेशी सिद्धार्थ(रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: खाटीक आसीम(रोख ३००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), आठवा:महाजन विनीत(पारितोषिक व प्रमाणपत्र), नववा: चव्हाण वैभव(पारितोषिक व प्रमाणपत्र), दहावा: चौधरी अमोल(पारितोषिक व प्रमाणपत्र).
*पंधरा वर्षा आतील गट*
प्रथम: गवळी प्रथम(रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र), द्वितीय: रणदिवे जयदीप(रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),तृतीय: चौधरी सिद्धेश(रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ: मराठे दुर्वेश(रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा: मराठे भावेश(रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: चौधरी क्रीयांश(रोख २००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: बागुल निकिता(रोख १००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),आठवा: मांडे रोहन(पारितोषिक व प्रमाणपत्र),नववा: यादव समीर(पारितोषिक व प्रमाणपत्र),दहावा:महाजन हर्ष (पारितोषिक व प्रमाणपत्र).
*अकरा वर्षा आतील गट*
प्रथम: भामरे देवांशू(रोख ३०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),द्वितीय: पाटील जयदीप(रोख २०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),तृतीय: शर्मा तीर्थ(रोख १०००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),चतुर्थ:घरटे शौर्याजाधव माहीर(रोख ७००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),पाचवा:शिंदे यामिनी(रोख ५००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सहावा: पाटिल हार्दिक(रोख २००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),सातवा: जाधव शौर्य(रोख १००रू.पारितोषिक व प्रमाणपत्र),आठवा:घरटे शौर्य(पारितोषिक व प्रमाणपत्र),नववा: गिते अर्णव(पारितोषिक व प्रमाणपत्र),दहावा: गिरासे कुणाल (पारितोषिक व प्रमाणपत्र).
सदर स्पर्धेत लहान बुद्धिबळपटू खेळाडूंना खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी व चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी स्पर्धेत वय वर्षे सात ते दहा या वयोगटात विशेष प्रोत्साहनपर आकर्षक पारितोषिक देण्यात आले. ती पुढील प्रमाणे:- सात वर्षातील: ठाकरे दर्शिका, धगधगे तेजस, आठ वर्षातील: ठाकरे हर्षिता, बेडसे आदेश, नऊ वर्षातील: ठाकूर दुर्वेश, खानिया मैत्री, दहा वर्षातील: गाडे दुर्गा, इंदानी ह्रिदयांश होते. स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून प्रा. शोभराज खोंडे, प्रा.अश्वमेघराज खोंडे, सागर महाजन, विनीत बागुल, डॉ. गोपाल गवई, डॉ महेश जगताप, डॉ जितेंद्र माळी, प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.किरण चौधरी, डॉ. रविंद्र माळी, खलिक शेख, अल्तमश बागवान, आदींनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ.विजय शर्मा यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी केले व आभार डॉ. अरविंद कांबळे यांनी मानले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ.अनिल बेलदर, डॉ राजेंद्र पाटील, डॉ वजीह अशर, डॉ.जगदीश चव्हाण, डॉ.सुधाकर उजगिरे, प्रा.निलेश आठवले, कॅप्टन डॉ सुभाष भालेराव, डॉ.राहुल पाटील, डॉ.प्रशांत जगताप,,प्रा.मनोज चौधरी, डॉ तुषार पटेल, डॉ विशाल भोसले, एस.एम.भांडारकर, गोपाळ सोनार, संजय विसावे, दिलवर ठाकरे, दिनेश बागले, सुदाम सोनवणे आदींनी काम पाहिले.