जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस
नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत पाच बोगस डॉक्टर आणि विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील नऊ डॉक्टर यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आतापर्यंत ५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर शोधमोहिम अद्यापही सुरु आहे. यांतर्गत धडगाव तालुक्यात येत्या दोन दिवसात दोघांवर कारवाईची शक्यता आहे.धडगाव येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यानंतर ९ जणांनी कागदपत्रे किंवा वैद्यकीय व्यवसायाचे पुरावे दिलेले नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
धडगाव शहरात नुकत्याच एकावर कारवाई करण्यात आली आहे. संशयित बोगस डॉक्टर याठिकाणी तब्बल १३ वर्षांपासून कार्यरत आहे.
त्याच्यावर यापूर्वी एकदा गुन्हा दाखल आहे. पुन्हा त्याच ठिकाणी आरोग्य विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.कागदपत्रे सादर करण्याचे सूचित करण्यात आले होते. यात काही जणांनी आपली कागदपत्रे दिली आहेत. परंतू काहींनी दिली नसल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे. यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात मोहिम पुन्हा वेग घेणार आहे.