Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात शासकीय नोकरीचा उत्सव;१४२ उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्रे

team by team
October 3, 2025
in राजकीय
0
जिल्ह्यात शासकीय नोकरीचा उत्सव;१४२ उमेदवारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्रे

नंदुरबार l प्रतिनिधी

“शासकीय नोकरी मिळाली” हे वाक्य अनेक घरांमध्ये आनंदाश्रूंनी उच्चारले जाणारे ठरणार आहे. स्वप्नांना दिशा देणारा आणि संघर्षाला यशात परिवर्तित करणारा क्षण नंदुरबार जिल्हा अनुभवणार आहे. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत शासनाने अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण जारी केले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या स्वप्नांना मूर्त रूप मिळवून देण्याचा संकल्प केला.

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे हा सुवर्णक्षण साजरा होणार आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा पालकमंत्री अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण होईल.

*स्वप्न वास्तवात*
गावागावातून अभ्यासासाठी शहरात आलेले विद्यार्थी, दिवसरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये यश मिळवणारे ५२ तरुण आणि आपल्या पालकांना गमावूनही शासनाच्या अनुकंपा नियुक्तीद्वारे आधार मिळवणारे ९० उमेदवार हे सर्वजण आता शासन सेवेत पाऊल ठेवणार आहेत.
• ५२ उमेदवार गट-क महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक)
• ३१ उमेदवार अनुकंपा गट-क भरती
• ५९ उमेदवार अनुकंपा गट-ड भरती
असे एकूण १४२ उमेदवारांचे स्वप्न या दिवशी पूर्ण होणार आहे.

*आशेचा दिवा प्रज्वलित करणारी अनुकंपा नियुक्ती*
अनुकंपा नियुक्ती मिळणे म्हणजे फक्त एक नोकरी नाही; तर आधार गमावलेल्या कुटुंबासाठी जगण्याचा नवा आधार. काही उमेदवारांच्या डोळ्यात या दिवशी आनंदाश्रू तर काहींच्या मनात कर्तव्य पार पाडण्याची नवी उमेद आहे. “बाबा गेले, पण आता घराला आधार मिळाला” अशी भावना अनेकांच्या मनात दाटून येईल.

*नव्या भविष्याची पहाट*
या नियुक्त्या नंदुरबार जिल्ह्याच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रशासनात तरुणाईचा नवीन ओघ येईल आणि नागरिकसेवा अधिक प्रभावी होईल. एकेकाळी अभ्यासाच्या वहीत लिहिलेली स्वप्ने आता नियुक्तीपत्रावर उमटलेली सही बनून समोर येत आहेत.

*जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण*
हा सोहळा केवळ नियुक्तीपत्र वितरणाचा नसून तरुणाईच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात रोजगाराच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून हा क्षण लक्षात राहील.

बातमी शेअर करा
Previous Post

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची साजरी

Next Post

जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी,13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Next Post
जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी,13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी,13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add