Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उधना ते ब्रम्हपूर अमृतभारत एक्स्प्रेसला नंदुरबार स्थानकावर माजी खा. डॉ. हिना गावित यांनी दाखवली हिरवी झेंडी

team by team
September 28, 2025
in राजकीय
0
उधना ते ब्रम्हपूर अमृतभारत एक्स्प्रेसला नंदुरबार स्थानकावर माजी खा. डॉ. हिना गावित यांनी दाखवली हिरवी झेंडी

नंदुरबार l प्रतिनिधी

उधना ते ब्रम्हपूर अमृतभारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेगाडीच्या धावण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकात ही रेल्वे गाडी आली असता माजी खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ती पुढे रवाना झाली.

याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉ.हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानून पुढे सांगितले की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्यासाठी आता नंदुरबार येथून रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. उधना ब्रह्मपूर एक्सप्रेस मुळे त्यात आणखी भर पडली. या नवीन एक्सप्रेसला देखील नंदुरबार येथे थांबा देण्यात आला आहे त्यामुळे येथून थेट जगन्नाथ पुरीला जाण्यासाठी नंदुरबार येथील भक्तगणांची मोठी सोय झाली आहे.

ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही पाच राज्यांना जोडेल: ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात. ट्रेन क्रमांक १९०२१/१९०२२ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही आठवड्याला सेवा देईल. ट्रेन क्रमांक १९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस ही दर रविवारी सकाळी ७:१० वाजता उधना येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:५५ वाजता ब्रह्मपूर येथे पोहोचेल. ही सेवा ५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. ट्रेन क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस ही दर सोमवारी ब्रह्मपूर येथून रात्री ११:४५ वाजता सुटेल आणि २५ ऑक्टोबर २०२५ पासून सकाळी ८:४५ वाजता उधना येथे पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुहास नाईक, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, मोहन खानवाणी, अविनाश माळी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चोरी गेलेल्या 5 मोटारसायकली हस्तगत, शहादा पोलीसांची कामगिरी

Next Post

धनगर व बंजारा समाजाच्या समावेशाला विरोध आणि आदिवासी आरक्षण यावर ठरली रणनीती : मा. आदिवासी विकास मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add