Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

team by team
September 20, 2025
in राजकीय
0
सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

शहादा l प्रतिनिधी

आदर्श परंपरा व संस्कृतीची जपणूक करणे नवीन पिढीची जबाबदारी आहे.त्यासाठीच कै.अण्णासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.या वक्तृत्व स्पर्धेला अकरा वर्षाची परंपरा आहे,असे प्रतिपादन पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले.

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै.अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती प्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात झाले. उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, शहादा पालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक के.डी. पाटील, मंदाने येथील माजी उपसरपंच अनिल भामरे,परीक्षक सतीश पप्पू (जळगाव) व सौ.स्मिता दिक्षित (जळगाव),वक्तृत्व स्पर्धेचे मार्गदर्शक माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील, माजी प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, विविध ज्ञानशाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती. दीपक पाटील पुढे म्हणाले,शालेय व महाविद्यालयीन जीवनात आदर्श परंपरांचे संस्कार होणे आवश्यक आहे.आपण जन्माला आलो आणि त्याचे सार्थक व्हावे असे जर वाटत असेल तर सामाजिक दृष्टीने सेवाभाव जपणे गरजेचे आहे. वक्तृत्व स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले.आभार प्रा. डॉ. चंद्रशेखर सुतार यांनी मानले. या वक्तृत्व स्पर्धेत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील 38 विविध महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला.अनेकांनी स्वदेशी, पर्यावरण संवर्धन, निसर्गाच्या घडामोडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींची ज्ञानसाधना याविषयावर आपले मनोगत व्यक्त केले मात्र तिसऱ्या महायुद्धाकडे जगाची वाटचाल याविषयी एकाही स्पर्धकाने मनोगत व्यक्त केले नाही. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील व सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, प्राचार्य डॉ.विश्वासराव पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्यांची उपस्थिती होती. मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धा संयोजन समितीच्या सदस्यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते.
दरम्यान, सकाळी सात वाजेपासूनच कै.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या लोणखेडा येथील पूर्णाकृती पुतळा तसेच मंडळाच्या प्रशासकीय कार्यालयासमोरील स्मारकस्थळी अभिवादनासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, श्रीमती कमलताई पाटील,सौ.जयश्रीबेन दीपक पाटील,सौ.माधवीबेन मकरंद पाटील, सौ.डॉ. रुचिता मयूर पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, सहकारिता, व्यावसायिक, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर,विद्याश्रम परिवारातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

*पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा:-*

प्रथम- विवेक पितांबर पाटील (व्यवस्थापन प्रशासन इन्स्टिट्यूट कबचौ उमवी जळगाव)
द्वितीय-अनुष्का सचिन विसपुते (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन एन्ड रिसर्च शिरपूर) व कल्पेश संजय माळी (ब्रह्मा व्हॅली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)
तृतीय- शिवानी रमेश मौर्य (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी शिरपूर)
उत्तेजनार्थ- कुंजन प्रवीण पाटील (आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन रिसर्च शिरपूर) व पवन बडग्या वळवी (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा)

बातमी शेअर करा
Previous Post

मिशन हायस्कूल येथे 14 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला हिंदी दिवस साजरा

Next Post

तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खा. डॉ. हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खा. डॉ. हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती

तिरुपती (आंध्र प्रदेश) येथे संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद; माजी खा. डॉ. हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add