नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार l प्रतिनिधी
लायन्स क्लब नंदुरबारच्या सेवा सप्ताहाची सांगता झाली. यात आरोग्य शिबीर, रक्तदान,व यूवा मार्गदर्शन वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले.लायन्स क्बलच्या सेवा सप्ताहात विविध उपक्रम यशस्वीपणे घेण्यात आले.
त्यात कोविडबाबत जनजागृती अंतर्गत डॉ. राजकुमार पाटील यांचे कोविड बाबत घ्यावयाची काळजी व उपचार याविषयी व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात शंभर लोकांना मास्कचे वितरण करण्यात आले.म.गांधी जयंती निमित्त म.गांधी यांच्या पूतळयास माल्यार्पण करून शहरातील जी.टी.पाटील महाविदयालयाच्या आवाराची साफसफाई करण्यात आली.जिल्हा रूग्णालयात रूग्ण व त्यांच्या २५० नातेवाईकांना अन्न-दान’ करण्यात आले.रक्तदानाचे महत्व यूवा वर्गाला कळावे यासाठी एनसीसी कॅम्प मध्ये डॉ.अर्जून लालचंदानी यांचे व्याख्यान तसेच चॅरिटी बिगीन्स एट होम या उक्ती प्रमाणे लायन्स सदस्यांनी कॅम्पमध्ये प्रथम रक्तदान करून कॅडेटसला आव्हान केले.त्याला प्रतिसाद म्हणून एकुण १९ कॅडेटसनी प्रथमच रक्तदान केले.पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी व वृक्षांचे महत्व लक्षात घेवून एनसीसी मैदानावर २० वृक्षांची लागवड व संवर्धन लायन्स परिवारांतर्फे करण्यात येणार आहे, तालूक्यातील खोडामळी येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन लायन्स क्लबद्वारे करण्यात आले, यात लायन्स परिवारातील विविध तज्ञ डॉक्टरांनी गावकऱ्यांची मोफत तपासणी केली. तसेच काही रूंग्णाना पूढील शस्त्रक्रिया व उपचार हे अंत्यत कमी खर्चात करून देण्याचे आश्वासन दिले. यात डॉ.राजकुमार पाटील,डॉ.वृषाली पाटील,डॉ.सी.डी.महाजन, डॉ.राकेश पटेल, डॉ.अनिल शाह,डॉ.विजय पटेल, डॉ.तेजल चौधरी, तसेच स्मित हॉस्पीटलच्या तज्ञ डॉक्टर टीमने रक्तदाब, मधूमेहसह,जनरल तपासणी,डोळे, हाड,व दातांविषयी,तसेच महिला बाबतच्या महत्वपूर्ण तपासण्या करून रूग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार केले.वरील सेवा सप्ताहात लायन्सचे अध्यक्ष शेखर कोतवाल, सचिव राहूल पाटील व लायन्स सदस्यांनी परिश्रम घेतले.








