नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करण्यात आली होती.
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी समारोपाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मानवी साखळीच्या सहाय्याने गणपती बाप्पाची प्रतिकृती साकारण्यात आली.
यावेळी बाल गणेश भक्तांकडून विविध गाणी, नृत्य तसेच सामूहिक गणेश स्तोत्र पठण सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी द फ्युचर स्टेप स्कूल भालेर चे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.