नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील एक ही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही. त्यांना मदत करण हेच आपलं ध्येय आहे.३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील कुठला अविस्मरणीय क्षण असेल तर तो दिव्यांगांना सायकल वाटपाने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य असून, त्यांना मदत केल्याने आपली आमदारकी सार्थ ठरल्याची भावना शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली.
आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून दिव्यांगांना शुक्रवारी नगरपरिषदेत ३ चाकी ई- चार्जेबल सायकलचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी माजी नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांनी सायकलींचे पूजन केले. यावेळी आ.रघुवंशी यांनी माध्यम प्रतिनिधींशी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून सायकल वाटपासाठी एजन्सी नेमण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना २१ ई चार्जेबल ३ चाकी सायकल देण्यात आल्या.
यावेळी याप्रसंगी उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान,माजी सभापती कैलास पाटील,उद्योगपती देवेंद्र जैन,माजी नगरसेविका भारती राजपूत,सोनिया राजपूत, मनीषा वळवी,ज्योती पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,गजेंद्र शिंपी,चेतन वळवी,फारूक मिस्तरी, प्रमोद शेवाळे,जगन माळी,रोशन कुरेशी, बाजार समिती संचालक किशोर पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत,हरून हलवाई,मानसी मराठे,प्रशासन अधिकारी जयसिंग गावित उपस्थित होते.
दिव्यांगांच्या आशीर्वाद
दोन दिवसांपूर्वी दिव्यांगांना सायकली वाटप करण्यात आल्या त्या दिवशी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात ६० टक्के पाणीसाठा होता. आज देखील सायकलींचे वाटप होत असून,दिव्यांग बांधवांच्या आशीर्वादामुळे शिवण नदी भरून विरचक धरणात शंभर टक्के भरून पाण्याच्या प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आ.रघुवंशी यांनी व्यक्त केली
मदतीने व्यक्त केले समाधान
२ दिवसांपूर्वीच आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते त्यानंतर शुक्रवारी २१ जणांना सायकलींचे वाटप करण्यात आले. आठवड्यातून दुसऱ्यांदा सायकल वाटप करण्यात आल्या. त्यामुळे दिव्यांगांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.येत्या कालावधीत देखील सायकलींचे वाटप करण्यात येईल अशी माहिती आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.