नंदुरबार l प्रतिनिधी
दिव्यांगांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हि जशी शासनाची जबाबदारी आहे तशीच समाजातील प्रत्येक घटकाची असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार निधीतून अपंगांना ३ चाकी इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.नगरपरिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रिक चार्जेबल सायकल शासनाचा योजनेतून देण्यात येते. परंतु,त्या पेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना त्याच्या लाभ मिळत नाही.दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे हि जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाची देखील आहे. याच विचारातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार निधीतून ७० ते ८० पेक्षा कमी टक्केवारीतील अपंगांना ३ चाकी चार्जेबल सायकल घेण्याचे निर्णय घेतला होता.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार,परवेज खान,हिरालाल चौधरी,चेतन वळवी, फारूक मेमन,भारती राजपूत,सोनिया राजपूत,गजेंद्र शिंपी,प्रीतम ढंडोरे,फारूक मिस्तरी, रियाज कुरेशी,रोशन कुरेशी,मोहितसिंग राजपूत,हरून हलवाई,मानसी मराठे,प्रशासन अधिकारी जयसिंग गावित उपस्थित होते.