Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाने केला माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सत्कार

team by team
August 19, 2025
in राजकीय
0
ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाने केला माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रकाशा येथे विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांनी गुर्जर समाजातील पारंपरिक भजन, गण-गवळणी, रास, लळित उत्सव आर्दीची ओळख, संवर्धन व जतन करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन महोत्सव समारंभात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा सत्कार समस्त गुजर समाजाच्या वतीने करण्यात आला.

रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरासह पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांच्या ३०० रोपांचे वाटपही या महोत्सवात करण्यात आले. गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे , उद्योजक शशिकांत पाटील, निझर येथील समाजाचे महामंत्री जगदीश पाटील, सद्‌गुरू धर्मशाळेचे चेअरमन मोहन चौधरी, नंदुरबार येथील डीवायएसपी संजय महाजन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील एकूण २९ भजनी मंडळांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते सहभागी सर्व भजनी मंडळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या उपक्रमात सदगव्हाण, तळवे, चौपाळे, वडोदरा, कोळदा, निझर, पातोंडा, कोरीट, प्रकाशा, सुरत, म्हसावद, पिंपरी, विद्याविहार, दामळदा, थानोरा, शहादा, थुरखेडा, वाका येथील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील गावांमधील मंडळांनीही सहभाग घेतला. यावेळी दोडे गुजर समाजाचे माजी अध्यक्ष डायाभाई पाटील, जि. प.च्या माजी सभापती हेमलता शितोळे, भागवताचार्य रवींद्र पाठक, अॅड. प्रभाकर चौधरी, दिलीप पाटील आदींनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

आपकी जय’ परिवाराचे कार्य कौतुकास्पद : डॉ.विजयकुमार गावित

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार

Next Post
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add