Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासनाच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीयांपर्यंत; पालकमंत्र्यांनी केले स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन

team by team
August 17, 2025
in राजकीय
0
शासनाच्या योजनांचा लाभ तृतीयपंथीयांपर्यंत; पालकमंत्र्यांनी केले स्वतंत्र कक्षाचे उद्घाटन

नंदुरबार । प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे तथा पालकमंत्री यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे व समाज कल्याण निरीक्षक विवेकानंद चव्हाण उपस्थित होते.

तृतीयपंथी कक्षाच्या माध्यमातून तृतीयपंथीय बांधवांच्या तक्रारींचे निवारण, त्यांना शासनाच्या पात्र योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, आबा कार्ड, आरोग्य विमा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण यांसह शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक समावेश व हक्क संरक्षण यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे.

महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा दुसरा स्वतंत्र कक्ष असून, नंदुरबार जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमासाठी समाज कल्याण विभागाबरोबरच विघ्नहर्ता, नंदुरबार नवचैतन्य फाउंडेशन, नवनिर्माण, नंदुरबार व सीवायडीए, नंदुरबार या स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले.

तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व सामाजिक संस्था मिळून सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुस्लीम अल्पसंख्यांक समाजातर्फे अल्पसंख्यांक विकास मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचा नागरी सत्कार

Next Post

गणेशोत्सव विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी ७ कोटींची तरतूद :पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add