नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या राजकारणाला महत्वाचे स्थान असलेल्या
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजी ४७ उमेदवारी विविध गटातून अर्ज दाखल केले . त्यात विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे , आमदार शिरीषकुमार नाईक , माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे . निवडणूक बिनविरोध करायची का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढायची याचा निर्णय माघारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.अर्ज दाखल करण्यासाठी २० ऑक्टोंबर रोजी शेवटची मुदत आहे .
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागासाठी ही निवडणुक होत आहे.२१ नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजी गर्दी झाली होती . बँकेचे विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्था गटातून दोन , माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व राम चंद्रकांत रघुवंशी यांनी वि . का . सहकारी संस्था गटातून अर्ज दाखल केला . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी वि . का . सहकारी संस्था व इतर मागासवर्गातील जागेसाठी प्रत्येकी एक असे दोन भाजपचे प्रभाकर चव्हाण यांनी शिरपूर तालुक्यातून सहकारी संस्था गटातून चार , तळोदा तालुक्यातील भरत बबन माळी यांनी चार , इतर शेती संस्था गटातून अनिकेत विजय पाटील यांनी दोन , शहादा येथील दीपक पुरुषोत्तम पाटील , साक्री तालुका सहकारी संस्था गटातून हर्षवर्धन शिवाजी दहिते यांनी तीन , इतर शेती संस्था गटातून सुरेश रामराम पाटील , दर्यावगीर दौलतगीर महंत यांनी विमुक्त जाती , भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील गटातून साक्री तालुक्यातून चार , काँग्रेसचे डॉ . दरबारसिंग नारायणसिंग गिरासे यांनी याच गटातून अर्ज भरला . याशिवाय अक्कलकुवा तालुक्यात वि . का . सोसायटी गटातून आमशा फुलजी पाडवी यांनी दोन , सहकारी संस्था गटातून नवलनगरच्या शीलाबाई विजय पाटील यांनी महिला गट व वि . का . सोसायटी गटातून प्रत्येक एक असे दोन अर्ज , अनुसूचित जाती किंवा जमाती गटातून नवापूरचे शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक , नवापूर तालुक्यातील सहकारी संस्था गटातून अभिमन फुलसिंग वसावे , इतर शेती संस्थेतून धुळ्याचे चंद्रजित सुरेश पाटील , महिला गटासाठी कुसुंबा येथील कांचन चिमणराव पाटील यांनी दोन व इतर शेती संस्थेतून दोन असे चार अर्ज भरले . इतर शेती संस्थेतून धुळ्याचे डॉ . संजय तुकाराम पाटील , वि.का. सहकारी संस्थेसाठी कापडणे येथील भगवान विनायक पाटील , कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्थेतून नंदुरबारचे अंकुश विक्रम पाटील , विमुक्ती जाती , भटक्या जमाती गटातून रनाळेचे सुरेश फकिरा शिंत्रे , महिला प्रतिनिधीसाठी रनाळेच्या हिरकणबाई बाबुराव पाटील , अक्राणीमहल तालुक्यातून सहकारी संस्थेसाठी संदीप मोहन वळवी , जहांगीर बाबा पाडवी , इतर मागासवर्गीय व इतर शेती संस्था गटासाठी प्रत्येक एक असे दोन , नंदुरबारचे दीपक प्रभाकर दिघे यांनीही अर्ज दाखल केला .आज ईदची सुट्टी , अर्ज प्रक्रिया बंद उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे . दरम्यान मंगळवारी ईदची सुटी असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद असेल . शेवटच्या दिवशी काही प्रमुख उमेदवारांकडून अर्ज दाखलची शक्यता आहे . माघारीसाठी दि.८ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे . निवडणूक बिनविरोध करायची का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढायची याचा निर्णय माघारीपर्यंत होण्याची शक्यता आहे .








