शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलन सप्ताहाचा नगरपालिकेसमोर करून समारोप
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील विविध रस्त्यांवर असलेले खड्डे दुरुस्त करण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत येथील रस्त्यावरील खड्ड्यात संदर्भात सप्ताहभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नगरपालिके समोर अंत्यविधीसाठी वाजविण्यात येणारे डफ ही वाजंत्री वाजवून आंदोलन करण्यात आले.आंदोलन संपर्कप्रमुख गुलाब वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
शिवसेना उबाठा पक्षामार्फत शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्या ची दुरुस्ती करून रस्ते बनविण्यात यावे यासंदर्भात महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वात ११ जुलै ते १७ जुलै पर्यंत आंदोलनाच्या सप्ताह राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत १७ जुलै रोजी शेवटच्या दिवशी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. त्यात शिवसेना संपर्कप्रमुख गुलाब वाघ यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक यांनी सहभाग नोंदणीला. यात पालिका प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले. लवकरच रस्त्याचे काम करण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेनेचे शिवसेना संपर्कप्रमुख गुलाब वाघ, सह संपर्कप्रमुख दीपक दवते, नवापूर विभाग उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, तालुकाप्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख प्रमोद वाघ,जिल्हा संघटक सुनील सोनार उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, महानगर प्रमुख पंडित माळी, शहर प्रमुख राजधर माळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर पाटील, शहादा तालुकाप्रमुख राजू लोहार, शहर प्रमुख सागर चौधरी, तालुका संघर्ष प्रमुख गणेश चित्रकथे, तालुकाप्रमुख गणेश कुमावत, उपतालुकाप्रमुख पंडित माळी, अशोक अहिरे, अक्कलकुवा उपजिल्हाप्रमुख गोटू परदेशी, तालुकाप्रमुख रमेश वसावे, तालुका संघटक प्रमोद बागले, शहर प्रमुख नंदलाल चौधरी, नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील, उपतालुका प्रमुख निंबा पाटील शहर संघटक भक्तवत्सल सोनार, महिला तालुका संघटीका सोनल चव्हाण, जिल्हा सचिव दिनेश भोपे, चार समन्वयक अक्षय श्रीखंडे, वाहतूक सेना प्रमुख घारू कोळी, शहर प्रमुख दादा कोळी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राज पाटील, बापू महाजन यांचा सह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
येथील जुने नगरपालिका पासून डफ ही वाजंत्री वाजवून नगरपालिका इमारतीपर्यंत घोषणा देत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पालिका प्रवेशद्वारासमोर दाखल होऊन आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाचा विरोधात घोषणा देण्यात आल्या. झोपी गेलेल्या प्रशासनात जागवण्यासाठी सप्ताह भर आंदोलन करण्यात आले असल्याचे संपर्कप्रमुख गुलाब वाघ यांनी सांगितले.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे योगेश पाटील, प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख पहलवान, खानदेश क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.