नंदुरबार l प्रतिनिधी
पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारणे आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करणे या उद्देशाने के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई ता.नंदुरबार इको क्लब फॉर मिशन लाइफ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्यात आला.
प्राचार्य शरद पाटील यांच्या हस्ते इको क्लबचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थी व माता पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्यांनी इको क्लबचे महत्त्व, कार्य आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाविषयी माहिती दिली.
याप्रसंगी विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक तसेच इको क्लबचे सदस्य रोहित पाटील, श्रीमती नीलिमा पवार, कैलास पाटील हे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करेले यांनी केले, रोहित पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.